गावाविषयी माहिती
मध्य वैतरणा नदीच्या मध्यभागी ग्रुप ग्रामपंचायत कारेगाव कोचाळे हे महाराष्ट्र राज्यात उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील सह्याद्री पर्वत च्या छायेत असलेल गाव आहे. कारेगाव गावात हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे 2926 आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 3, अंगणवाडी केंद्रे 5 व व्यायामशाळा1, उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारेगाव अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय,सार्वजनिक विहिरी व बंधारे, सार्वजनिक नळ योजना अशा सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात,नाचणी,वरी,उडीद,तूर,कुळीथ ही प्रमुख पिके घेतली जातात. या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते, साखरी ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अनेक लाभ्यार्थ्याना शौचालय उपलब्ध करून शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ८ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
गाव आज मोखाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
कारेगाव हे गाव मोखाडा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 35 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ ८५८.७२ हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण 842 कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २९26 आहे. त्यामध्ये १७६५ पुरुष व ११61 महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगर उतार आणि सपाट असा मिश्र प्रकारचा प्रदेशात असून शेतीयोग्य काही भाग आहे. येथे हवामान उष्ण व दमटआहे आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ४२° से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ३०० ते ९०० मि मी. पर्जन्यवृष्टी होते.
लोकजीवन
कारेगाव कडुचीवाडी कोचाळे गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात,नाचणी,वरी,उडीद,तूर,कुळीथ पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा बोहाडा हा उत्सव गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे. येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
कारेगाव गावच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
संस्कृती व परंपरा
कारेगाव कडुचीवाडी कोचाळे गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच कारेगाव गावात हनुमान जयंती व कारेगाव या गावात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी बोहाडा हा उत्सव साजरा केला जातो. अनेक देवी – देवतांचे मुखवटे परिधान करून मिरवणूक काढली जाते हे एक आकर्षण आहे , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व बोहाडा, हनुमान जयंती यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,पोळा यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात. यामुळे कारेगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
प्रेक्षणीय स्थळे
ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत मारुती मंदिर,मरीआई गाव देवी मंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
शेती – कारेगाव कडुचीवाडी कोचाळे येथे भात,नाचणी व वरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील अनेक शेतकर्यांकडे आंबा, काजू च्या बागा आहेत त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असतात.
जवळची गावे
कारेगाव कडुचीवाडी कोचाळे या गाव तसेच मोखाडा तालुक्यातील पूर्वेस असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत. खोडाळा या ठिकाणी आठवडी बाजार भरतो.